शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

मान्सून उंबरठ्यावर, कोकणासह राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 06:03 IST

नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटकात स्थिरावला असून रविवारी कोकणात सिंधुदुर्गसह राज्यातील काही भागांत वादळ-वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. राज्यात पावसाच्या आगमनास अनुकूल स्थिती असून शनिवारपासून सुरू असलेल्या ठिकठिकाणच्या पावसाने मान्सूनची वर्दी दिली आहे.

मुंबई : नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटकात स्थिरावला असून रविवारी कोकणात सिंधुदुर्गसह राज्यातील काही भागांत वादळ-वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. राज्यात पावसाच्या आगमनास अनुकूल स्थिती असून शनिवारपासून सुरू असलेल्या ठिकठिकाणच्या पावसाने मान्सूनची वर्दी दिली आहे. कोकणात ६ ते ८ जूनपर्यंत मान्सून धडकणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले आहे.मान्सूनचे आगमन झाल्यानंतर १० जूनपर्यंत तो अर्धा महाराष्ट्र व्यापेल. १३ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ६ व ७ जूनला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे़ रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जालना, सोलापूर, जळगाव जिल्ह्यातही पाऊस झाला.४ जूनला कोकण,गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ५ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यतापावसाचे पाच बळीधुळे जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वाºयांसह जोरदार पाऊस झाला. वरखेडी गावाजवळ शेतातील एका घरावर रात्री झाड पडून अनिता दादूराम पावरा (३२) यांच्यासह वशिला (३), पिंकी (२) व रोशनी (१) या त्यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या. दुर्घटनेत दादूराम पावरा बचावले. नाशिकला इगतपुरी तालुक्यात वीज पडून दशरथ धोंडू ढवळे (२७) याचा मृत्यू झाला. सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली.मान्सूनची वेगाने वाटचाल सुरू आहे. १५ जूननंतर राज्यातील सर्व भागात जोराचा पाऊस सुरू होईल. १५ ते २० जून दक्षिण महाराष्ट्रात पाऊस उघडीप देईल. जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर शेतकºयांनी पेरणी करावी.- डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामान तज्ज्ञ

टॅग्स :Rainपाऊस