संभाजी ब्रिगेडसह प्रविण गायकवाड शेकापमध्ये!
By Admin | Updated: January 10, 2017 04:45 IST2017-01-10T04:45:21+5:302017-01-10T04:45:21+5:30
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत

संभाजी ब्रिगेडसह प्रविण गायकवाड शेकापमध्ये!
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. गायकवाड यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्ते पुण्यातील शनिवार वाडा येथे १२ जानेवारीला आयोजित केलेल्या कार्यक्रमात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे शेकापचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सत्ता हा महत्त्वाचा पर्याय असल्याने समाजकारणातून राजकारणात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, नचिपण समितीच्या शिफारसी लागू होत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मुंबईत मोर्चा काढून उपयोग नाही. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर गंभीर नाही. त्यामुळेच सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत अन्न, वस्त्र आणि निवारा पूर्ण करणाऱ्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गायकवाड यांच्यासह त्यांच्या तालुका आणि जिल्हा कार्यकर्त्यांना योग्य ती जबाबदारी देऊ, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)