शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार संवेदनाहीन : दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 16:17 IST

राज्यात कुठेही आंदोलन,उपोषण झाल्यास दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी स्वता: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलवत होते.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार संवदनाहीन आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात 24 दिवसांपासून आंदोलक आंदोलन करत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. तर भाजपची सत्ता असताना राज्यात कुठेही आंदोलन झाल्यास त्याची दखल घेऊन मार्ग काढला जात होता, मात्र हे दुर्लक्ष करत असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागात नोकरभरती झाली. नोकरभरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या. मात्र नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. आंदोलनकर्त्यांची प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरेकर म्हणाले की, गेल्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना, राज्यात कुठेही आंदोलन,उपोषण झाल्यास दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी स्वता: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलवत होते. आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढत होते. तसेच कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळवून देण्याच काम ही त्यांनी केलं. मात्र हे सरकार आल्यापासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते पूर्णपणे संवदनाहीन असल्याची टीका दरेकर यांनी केली.