प्रत्युषाच्या प्रियकराला आले नैराश्य, रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: April 3, 2016 15:04 IST2016-04-03T14:55:16+5:302016-04-03T15:04:08+5:30

आत्महत्या करुन जीवन संपवणा-या प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंगला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pratyusha's lover came face to face with depression, hospitalization | प्रत्युषाच्या प्रियकराला आले नैराश्य, रुग्णालयात दाखल

प्रत्युषाच्या प्रियकराला आले नैराश्य, रुग्णालयात दाखल

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - आत्महत्या करुन जीवन संपवणा-या प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंगला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुलला नैराश्य आल्याने तसेच त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती राहुलचे वकिल नीरज गुप्ता यांनी दिली. 
 
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्ये प्रकरणी राहुलची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. शनिवारी मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी केली. बालिका वधू फेम प्रत्युषाने शुक्रवारी मुंबईतील गोरेगाव येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुल जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याने त्याला शनिवारी घरी जाऊ देण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. 
 
मी निर्दोष असून, मला प्रत्युषाबरोबर लग्न करायचे होते असे त्याने सांगितले. नोव्हेंबर २०१५ पासून माझे प्रत्युषा बरोबर प्रेमाचे सूर जुळले होते. मी तिला पत्नी म्हणून पहात होतो. मी शुक्रवारी घरातून निघालो नसतो तर, ती आज जिवंत असती असे राहुलने सांगितले. 
 
 

Web Title: Pratyusha's lover came face to face with depression, hospitalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.