शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:31 IST

देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार

ठळक मुद्देदेहूच्या तुकाराम महाराज संस्थानने सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आषाढी वारी सेवेसाठी पताकाधारी अश्वाची मागणी२४ जूनपासून देहू ते पंढरपूर सुरु होणाºया आषाढी पायी वारीत सहभागी होण्यासाठी शौर्यला वारीच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले

अकलूज : देहू ते पंढरपूर पायी आषाढी वारीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व रविवारी दुपारी १ वाजता अकलूज, धवलनगर येथील प्रतापगडावरुन रवाना झाला़ रवाना होण्यापूर्वी पद्मजादेवी मोहिते-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील यांनी ‘शौर्य’ची विधिवत पूजा करुन गूळ, हरभरा दाळ, धने, साखरेचा घास भरविला. यावेळी जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, संघटक आण्णासाहेब शिंदे, सतीश पालकर, सचिव सुधीर रास्ते, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले, बबनराव शेंडगे, पिंटू वैद्य, राजू निकाळजे, सोहेल खान, मयूर माने, ज्योती कुंभार आदी उपस्थित होते.

देहूच्या तुकाराम महाराज संस्थानने सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आषाढी वारी सेवेसाठी पताकाधारी अश्वाची मागणी केली होती. त्यावेळी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी वारीच्या सेवेसाठी मानाचा पताकाधारी अश्व दिला. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी ही सेवा अखंडित सुरु ठेवली आहे.

२४ जूनपासून देहू ते पंढरपूर सुरु होणाºया आषाढी पायी वारीत सहभागी होण्यासाठी शौर्यला वारीच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मारवाड जातीचे अश्व योग्य असते. शौर्य अश्व मारवाड जातीचे आहे. ते शुभ लक्षणी व गुण लक्षणी असे अश्व आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मानाचा पताकाधारी स्वार असलेला शौर्य अश्व भक्तिमय वातावरणात रिंगण धावतो तेव्हा आध्यात्मिक समाधान प्राप्त होते. 

 - डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील 

३० वर्षांपूर्वी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी देहू संस्थानने केलेल्या मागणीप्रमाणे अश्व वारीसेवेसाठी देऊ केला होता. आध्यात्मिक क्षेत्रात आमच्या अश्वाला सेवेचा मान मिळतो, ही मोठी भाग्याची व समाधानाची बाब आहे़ साहेबांच्यानंतरही वारीसाठी अश्वाची सेवा अखंडितपणे सुरु ठेवली आहे. पुढेसुद्धा ही सेवा कायम राहील.- पद्मजादेवी मोहिते-पाटील

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरdehuदेहूAlandiआळंदीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा