बुलडाणा लोकसभा मतदारसंघातही ‘नमो’ मंत्राचा ‘प्रताप’!
By Admin | Updated: May 16, 2014 22:23 IST2014-05-16T22:23:34+5:302014-05-16T22:23:56+5:30
प्रतापराव जाधव यांना ‘नमो’ मंत्र पावला असून, बुलडाण्यातील शिवसेनेचा झेंडा सलग तिसर्या निवडणुकीत डौलाने फडकत ठेवला आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातही ‘नमो’ मंत्राचा ‘प्रताप’!
बुलडाणा : संपूर्ण देशात ह्यनमोह्ण मंत्राचा जयघोष सुरू असताना यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघानेही आपला सूर मिसळवला आहे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची अटीतटीची लढाई होईल, अशी सर्वांची गणिते होती; मात्र ही गणिते सपशेल अपयशी ठरली, गेल्या लोकसभा निवडणुकीत २८ हजाराने विजयी झालेल्या प्रतापराव जाधव यांना ह्यनमोह्ण मंत्र पावला असून, यावेळी ते लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राष्ट्रवादीेचे कृष्णराव इंगळे यांचा त्यांनी १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला असून, बुलडाण्यातील शिवसेनेचा झेंडा सलग तिसर्या निवडणुकीत डौलाने फडकत ठेवला आहे. आज सकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या मतमोजणीत टपाली मतदानापासून प्रतापरावांनी घेतलेले मताधिक्य हे ह्यइव्हीएमह्णमधुन सुद्धा तसेच बाहेर पडले. पहिल्या फेरीपासून प्रतापरावांनी मतांची घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे त्यांचा लिड अखेरपर्यंत तोडू शकले नाही. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीसाठी सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पहिल्या दोन फेरीतच निवडणुकीचा कौल स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला तर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडून दिले. विजयाचे आकडे पाहता मोदींची लाट अतिशय प्रभावीपणे चालली, हे स्पष्ट होते. शिवसेनेच्या मेहनतीला मोदी लाटेने यश मिळवून दिले. बुलडाण्याच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत कुणालाही इतक्या प्रमाणात मते मिळाली नाहीत. एकूण मतदानाच्या ५२ टक्के मते घेत प्रतापरावांनी केलेला हा ह्यप्रतापह्ण नव्या इतिहासाची नोंद ठरला असून, त्यामागे नमो मंत्र असल्याचे सर्वच मान्य करतात.
**या कारणांमुळे मिळाला विजय
*अँन्टी इन्कम्बन्सीमुळे असलेल्या नाराजीचा सामना प्रतापरावांनाही करावा लागला होता; मात्र मोदींची लाट या नाराजीपुढे वरचढ ठरली. प्रतापरावांनी घेतलेल्या मेहनतीला मोदींसाठी लोकांनी भरभरून मतांचे दान दिले.
*मराठाबहुल असलेल्या बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांच्यासाठी जातीय समीकरण फायद्याचे ठरले. मराठा विरूद्ध मराठेत्तर अशी लढाई होणार नाही, याची दक्षता त्यांनी प्रचारात घेतली, ती यशस्वी ठरली.
*राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव, राष्ट्रवादीत असलेली नाराजी प्रतापरावांच्या पथ्यावर पडली. तर दुसरीकडे महायुतीमध्ये असलेल्या लहान-मोठय़ा कुरबुरी मोडून काढत महायुती एकसंघ ठेवण्यात प्रतापराव जाधव यशस्वी झालेत.