प्रशांत ठाकूर भाजपात?

By Admin | Updated: September 18, 2014 01:34 IST2014-09-18T01:34:00+5:302014-09-18T01:34:00+5:30

माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली.

Prashant Thakur BJP? | प्रशांत ठाकूर भाजपात?

प्रशांत ठाकूर भाजपात?

पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. लवकरच ठाकूर आणि त्यांचे समर्थक भाजपात अधिकृत प्रवेश करीत अशी माहिती विश्वसनीय सुत्रंकडून प्राप्त झाली. 
शेतकरी कामगार पक्षात थेट खासदारकीची निवडणूक लढवून दोनदा दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा रायगडच्या राजकारणात दबदबा आहे. 2क्क्4 साली त्यांनी लोकसभेचे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शेकापला रामराम ठोकून ते काँग्रेस पक्षात आले आणि या भागात पक्षाला उभारी दिली. विलासराव देशमुख यांचे खास समर्थक असलेल्या रामशेठ  ठाकूर यांनी 2क्क्6 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जे. एम. म्हात्रे यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराला पराभूत करून प्रशांत ठाकूर यांना नगराध्यक्ष बनवले. त्यानंतर 2क्क्9 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेकापची मजबूत तटबंदी मोडीस काढत पन्नास वर्षानंतर काँग्रेसचा आमदार पनवेलमध्ये निवडून आणण्याची किमया केल्या.  खारघर टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी ही मागणी पूर्ण झाली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कानाडोळा केल्यामुळे ठाकूर व्यथीत झाले आणि त्यांनी राजीनामा दिला.

 

Web Title: Prashant Thakur BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.