पारसकर यांना बढती आणि बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 04:48 IST2016-10-08T04:48:11+5:302016-10-08T04:48:11+5:30

गृह मंत्रालयाने शुक्रवारी बढती देत त्यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके या पदावर केली आहे.

Prasakar promoted and changed | पारसकर यांना बढती आणि बदली

पारसकर यांना बढती आणि बदली


मुंबई : मॉडेलवरील कथित बलात्कार प्रकरणी गुन्ह्यातून निर्दोष सुटलेले आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना गृह मंत्रालयाने शुक्रवारी बढती देत त्यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके या पदावर केली आहे.
मालाड परिसरातील २७ वर्षीय मॉडेलने केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन पी.सी.आर. विभागाचे उपमहानिरीक्षक असलेल्या पारसकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पारसकर यांना तपासादरम्यान सेवेतून निलंबित करण्यात आले होते. न्यायालयाने डिसेंबर
२०१५ मध्ये पारसकर यांची
निर्दोष मुक्तता केली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पारसकर यांची फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील
रिक्त असलेल्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Prasakar promoted and changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.