शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:07 IST

सरकारकडे शाळांनी भीक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात शिक्षकांत नाराजी आहे.

मुंबई : सरकारकडे शाळांनी भीक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात शिक्षकांत नाराजी आहे. जनप्रबोधिनी आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात जावडेकर यांनी अनुदान मागणाºया शाळांना संबोधित करताना हे वक्तव्य केले होते. मात्र विरोधी पक्षात असताना याच मुद्द्यावर भाजपाने शिक्षकांना आश्वासन दिले होते. त्यामुळे मतांसाठी खोटी आश्वासने देत अशी वक्तव्ये करणाºया जावेडकर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की, विरोधी पक्षात असताना स्वत: प्रकाश जावडेकर यांनी शाळांना अनुदान व शिक्षकांना वेतन मिळावे, यासाठी शिक्षक व शाळांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. विनाअनुदान शाळा चालविणे कठीण बाब आहे, म्हणून सत्तेवर आल्यास भाजपा १०० टक्के अनुदान देईल, असे आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले होते. उपाशीपोटी क्रांती होऊ शकत नाही, मग चांगले अध्यापन कसे होणार, असा सवाल उपस्थित करत भाजपा शिक्षकांना उपाशीपोटी ठेवणार नाही, असे जावडेकर यांनी भाषणात सांगितले होते. मात्र सत्ता येताच त्यांना या भाषणाचा आणि आश्वासनांचा विसर पडल्याची टीका पाटील यांनी केली आहे.भीक मागू नये, अशी विधाने करून ते त्यांच्या शिक्षण देण्याचा मुख्य जबाबदारीला झटकत असल्याचा आरोप काँग्रेसच्या शिक्षक सेलने केला आहे.सर्वच ठिकाणी सक्षम विद्यार्थी नसतात. विद्यार्थी त्यांच्या मनाने आपले कर्तव्य समजून शाळेला सहकार्य करीतच असतात. शासन म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही, असा सवाल शिक्षक महादेव सुळे यांनी केला आहे. सरकार अनुदान देते म्हणजे भीक देत नाही. वेतनेतर अनुदानाअभावी शाळेचे, वेतनाअभावी शिक्षकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सल्ले देण्याऐवजी आवश्यक मदत करण्याचे आवाहनही सुळे यांनी केले.जुनी पेन्शन हक्क संघटनेकडूनही विरोधशाळा विद्यार्थ्यांसाठी मागते ती भीक नसते. चांगले करण्याची धडपड असते, असे सांगत जुनी पेन्शन हक्क संघटनेने जावडेकर यांचा विरोध केला. त्यांनी तोंडाला लगाम घालावा, असे संपर्कप्रमुख प्राजक्त झावरे-पाटील म्हणाले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरTeacherशिक्षक