शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

वंचित आघाडीच बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवणार; रामदास आठवलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:18 IST

रामदास आठवले यांचा आरोप. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रयोगा’चा युतीलाच थेट लाभ मिळणार असल्याचे मत

- सुरेंद्र राऊत  यवतमाळ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी स्थापन करून नवीन राजकीय प्रयोग केला. मात्र, या आघाडीमुळे बहुजन समाजच सत्तेपासून वंचित राहणार आहे. या आघाडीचा थेट लाभ भाजपा-शिवसेना महायुतीला होणार असल्याचा आरोप रिपाइंचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 

आठवले यवतमाळात मुक्कामी होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. आठवले म्हणाले, आमचा युतीला उघड पाठींबा आहे. तर आंबेडकर छुप्या पद्धतीने युतीची मदत करीत आहेत. रिपाइं आठवले गटाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार करणार आहे. यवतमाळात प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच विदर्भातील नाराज रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी मान-सन्मान मिळत नसल्याने महायुतीत राहण्याबाबतचा फेरविचार केला जावा, अशी मागणी केली. 

याकडे आठवलेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या सर्व नाराज रिपाइं कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून नाराजी दूर केली जाईल. रिपाइं कार्यकर्ते प्रतिकुल परिस्थितीतही एकदिलाने काम करतील. वंचित आघाडीमुळे  काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे मत विभाजन अटळ आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मतेच ‘मायनस’ होणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम