शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 11:04 IST

Prakash Ambedkar : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. पण, एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम आहे. यातच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह देत म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?",  असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीपासूनच आपण शिवसैनिकच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. पण, ते वेगळा गट करूनच भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होतील, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेत सर्वात मोठे बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचे एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर काय बोलतात, याचा भाजपशी काही संबंध नाही- अतुल भातखळकर भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेले सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे, असेही अतुल भातखळकर म्हणाले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा