शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ती चूक करू नका; आरक्षण प्रश्नावरून प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 10:29 IST

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या बाजूने रोखठोक भूमिका घेतली आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काल मुंबईत संविधान सन्मान सभा पार पडली. या सभेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. तसंच आरक्षण प्रश्नावरून टीका करणाऱ्या ओबीसी नेत्यांना इशारा दिला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांना एक सल्लाही दिला आहे.

मराठा आरक्षणाबाबत भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. जरांगे पाटील यांना सल्ला आहे की, सल्लागारांचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी जी चूक केली होती, ती करू नका," असं आवाहन त्यांनी केलं. "जरांगे पाटील यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, तशी चूक करू नये. जरांगे यांनीही आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये," असंही आंबेडकर म्हणाले.

'माझ्या नादी लागू नका'

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना अंगावर घेत प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या बाजूने रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी नेत्यांच्या टीकेलाही सामोरं जावं लागत आहे. या टीकाकारांना उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, " आरक्षणाच्या मुद्द्यावर मी असं म्हटलो होतो की, ओबीसीचे ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचे ताट वेगळं असले पाहिजे. आरक्षणावरून वाद सुरू झालेला आहे. ओबीसीचे जे सध्याचे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नका. तुम्ही मंडलसोबत नव्हता तर कमंडलसोबत होता. जनता दलाबरोबर ओबीसी आरक्षण मिळवणारे आम्हीच होतो." या सभेत बोलताना आंबेडकर यांनी एक भीती व्यक्त केली आहे. "३ डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार होण्याची शक्यता आहे. पण जनतेला माझं आवाहन आहे की, भडकाऊ संघटना खूप आहेत, त्यांना सांगा की, तुमचा मुलगा आधी पुढं करा मग आम्ही येतो," असं ते म्हणाले. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आजच्या सभेला येऊन गेले. त्यांना माझा आग्रह आहे की, वंचित बहुजन आघाडीने संविधानाची चर्चा सुरू केली. काँग्रेसने सुद्धा दुसऱ्या राज्यात संविधानाच्या सन्मानाची जनसभा घ्यावी, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला केलं आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण