शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:42 IST

मनोज जरांगे पाटील स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी असल्याचा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील हे अंतरावालीत सातव्यांदा उपोषण करत आहेत. यावेळी सरकारवर टीका करताना राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे, तसा जीआर काढावा, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर टीका केली आहे. मनोज जरांगेंनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हेच दोषी असल्याचा आरोप केला आहे. 

"मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यांचे हे उपोषण जरांगे पाटील विरुद्ध सुरेश धस असे गृहित धरायचे का? की दुसरे काही म्हणायचे? शेतकरी कर्जमाफीला जसे शेतकरी दोषी आहेत, तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतः जरांगे दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेत नेऊन बसवले," असं प्रकाश आंबेडकर  म्हणाले. 

"मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले, पण भाजपला टार्गेट केले नाही. त्यामुळे त्यांनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवले. विशेष म्हणजे हीच भाजप त्यांना सर्टिफिकेट देण्यास तयार नव्हती," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण