शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्रगती, कोयना एक्सप्रेस पुढील दहा दिवस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 20:14 IST

मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपुर्वी घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...

ठळक मुद्दे मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात तांत्रिक तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे

पुणे : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक  तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. ही कामे पुढील दहा दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत प्रगती एक्सप्रेससह इतर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे. तर अन्य काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपुर्वी घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणकी काही कामे करणे आवश्यक असून पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस पुर्णपणे तर मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्सप्रेस दि. १५ आॅक्टोबरपर्यंत धावणार नाहीत. तर पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. ५ ते १४ आॅक्टोबर या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुर-मुंबई कोयना एक्सप्रेस ही गाडी दि. १४ आॅक्टोबरपर्यंत पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी नंतर पुण्यातून सोडण्यात येईल. मुंबई ते पुणे यादरम्यान गाडी धावणार नाही. तसेच हुबळी-मुंबई-हुबळी (दि. ५ ते १४), हैद्राबाद-मुंबई-हैद्राबाद (दि. ७ ते १५), विशाखापट्टण-मुंबई (दि. ५ ते १४), नांदेड-पनवेल-नांदेड (दि. ६ ते १५) या गाड्यांही पुण्यापर्यंतच धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.------------- रद्द करण्यात आलेल्या गाड्या (कंसात कालावधी)- पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस (दि. ६ ते १५ आॅक्टोबर)- मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस (दि. १५ आॅक्टोबर)- हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस (दि. ६ आॅक्टोबर)- मुंबई-पंढरपुर पॅसेंजर (दि. १० ते १२ आॅक्टोबर)- पंढरपुर-मुंबई पॅसेंजर (दि. ६, ११,१२ व १३ आॅक्टोबर)- मुंबई-विजापुर पॅसेंजर (दि. ६ ते ९ व १३ ते १४ आॅक्टोबर)- विजापुर-मुंबई पॅसेंजर (दि. ७ ते १० व १४ ते १४ आॅक्टोबर)- नांदेड-पनवेल पॅसेंजर (दि. १२ आॅक्टोबर)- पनवेल-नांदेड पॅसेंजर (दि. १३ आॅक्टोबर)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबई