प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार

By Admin | Updated: November 1, 2016 04:00 IST2016-11-01T04:00:05+5:302016-11-01T04:00:05+5:30

भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदार संघाकरिता अखेर काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले.

Prafula Agarwal Congress official candidate | प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार

प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार


गोंदिया : भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदार संघाकरिता अखेर काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे या मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी संपुष्टात आली असून तिहेरी लढत रंगणार आहे.
आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल्ल यांनी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या तिकीट मिळण्याआधीच आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रफुल अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मंगळवार १ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रफुल अग्रवाल नामांकन दाखल करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Prafula Agarwal Congress official candidate