शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"पटेल, तटकरे हे त्यांचे पक्षाचे नेते, त्यांनी काही ठरवलं असेल तर..."; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:33 IST

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी यासाठी गेली ४ महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. सर्व चर्चा या दोघांनी केली असं शरद पवारांनी सांगितले.

बारामती - अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महिला विराजमान होणार आहे. गुरुवारी अजित पवारांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत परतले. या नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आले. आज शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार असून त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडेल. या सर्व घडामोडी इतक्या वेगाने घडत असल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यात शपथविधीबाबत मला काही कल्पना नाही असं सांगत शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.

अजित पवारांना जाऊन ७२ तास झाले नाही तोवर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई केली जातेय का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला होता. त्यावर बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याची चर्चा इथं झाली नाही. ती चर्चा मुंबईत झाली. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हा त्यांचा अधिकार आहे. प्राधान्याने काय केले पाहिजे हे त्यांनी ठरवलेले दिसते. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर मी फार भाष्य करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी यासाठी गेली ४ महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. दुर्दैवाने या अपघातामुळे यात खंड पडला. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता. पण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेतले असतील असा खुलासाही शरद पवारांनी केला.

दरम्यान, जे गेले आहेत त्यांना परत आणले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत असेल तर आम्हाला आत्मविश्वास मिळू शकतो. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar clarifies on Sunetra Pawar's Deputy CM role.

Web Summary : Sharad Pawar addressed Sunetra Pawar's potential Deputy CM role, stating internal party decisions were made by Patel, Tatkare. He mentioned ongoing merger talks between factions, disrupted by unforeseen events. He emphasized the need for someone to assume responsibility after Ajit Pawar's passing, supporting Sunetra's nomination.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार