शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचे निकष अव्यवहार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 04:04 IST

मंजुरीची प्रक्रिया किचकट; योजना फायदेशीर नसल्याने खासगी विकासकांची पाठ

- संदीप शिंदे मुंबई : पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरी भागात परवडणारी घरे उभारली तर आपल्या गृहप्रकल्पांमधील घरांचे भावही कोसळतील, अशी भीती विकासकांच्या मनात आहे. त्याशिवाय या योजनेतील घरांचा आकार आणि सवलतींमुळे प्रकल्प व्यवहार्य ठरत नाही. योजना मंजुरीची प्रक्रिया किचकट, वेळखाऊ आहे. त्यामुळे या योजनेतील अपेक्षित असलेले गृहनिर्माण अवघड असल्याचे मत पालिका आणि म्हाडाचे अधिकारी तसेच खासगी विकासकांकडून व्यक्त होत आहे.या योजनेतील ११ लाख ४५ हजार मंजूर घरांपैकी ७ लाख ५० हजार घरे खासगी विकासकांच्या माध्यमातून उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निवासी वापराच्या जमिनीवर अडीच एफएसआय दिला जातो. तर, हरित क्षेत्रात ०.०५ ऐवजी एक एफएसआय मिळतो. या सवलतींमुळे विकासक आकर्षित होतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रालाच घरघर लागल्याने आमच्या प्रकल्पातील घरांचीच विक्री रोडावली आहे. आवास योजनेतून परवडणारी छोटी घरे उभी राहिली तर आमच्या प्रकल्पांतील घरांच्या विक्रीचा आकडा आणखी कोसळेल, अशी भीती एका नामांकित विकासकाने व्यक्त केली. त्याशिवाय या योजनेसाठी ३० आणि ६० चौ.मी.ची घरे अल्प उत्पन्न गटासाठी उभारणे बंधनकारक आहे. घरांची संख्या जेवढी लहान तेवढा बांधकाम खर्च वाढतो. त्याशिवाय म्हाडाला एएसआर दराने (अ‍ॅन्युअल शेड्यूल रेट) घरे देण्याचे बंधन आहे. त्यामुळे योजना व्यवहार्य ठरत नाही. लाभार्थी आणि विक्रीसाठीची घरे एकाच ठिकाणी हवीत. त्यात कुंपण घालण्याची मुभा मिळत नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घटकांसाठी घरे उभारणे संयुक्तिकठरत नसल्याचेही काही विकासकांनी सांगितले. याशिवाय जागेच्या मालकीपासून ते पर्यावरण विभागाची परवानगी आणि लोकेशन क्लीअरन्सपासून ते डीपीआर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आहे. केवळ स्थानिक पालिकाच नाही तर म्हाडा, राज्य, केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे विकासक चार हात लांब राहणेच पसंत करतात, अशी माहितीही हाती आली आहे.सवलती उपयुक्त नाहीप्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने सरकारी जमीन १ रुपया प्रति चौरस फूट नामामत्र दराने वितरित करण्याचा निर्णय १९ सप्टेंबर, २०१६ रोजी घेतला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घराच्या नोंदणीसाठी फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. मोजणी शुल्कात ५० टक्के सवलत जाहीर झाली. मात्र या योजना यशस्वी करण्यासाठी फारशा उपयुक्त ठरलेल्या दिसत नाहीत.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना