प्रदीप रायसोनी यांना सशर्त जामीन
By Admin | Updated: July 4, 2015 02:59 IST2015-07-04T02:59:10+5:302015-07-04T02:59:10+5:30
घरकूल प्रकरणातील आरोपी व माजी महापौर प्रदीप रायसोनी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर

प्रदीप रायसोनी यांना सशर्त जामीन
जळगाव : घरकूल प्रकरणातील आरोपी व माजी महापौर प्रदीप रायसोनी यांना शुक्रवारी
सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर
केला आहे. साडेतीन वर्षांपासून कारागृहात असलेल्या रायसोनी यांना धुळे येथे
वास्तव्यास राहण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व विजय कोल्हे यांना याआधी जामीन मंजूर झाला आहे. रायसोनी यांनी जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात ११ वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. (प्रतिनिधी)