वीजवाहिनीचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:54 IST2016-08-05T00:54:05+5:302016-08-05T00:54:05+5:30
रास्तापेठेतील नेहरू रस्त्यावरील साईनाथ आॅटोमोबाईलसमोरील रस्त्याखालील विजेच्या तारांमुळे बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्फोट झाला.

वीजवाहिनीचा स्फोट
पुणे : रास्तापेठेतील नेहरू रस्त्यावरील साईनाथ आॅटोमोबाईलसमोरील रस्त्याखालील विजेच्या तारांमुळे बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे डांबरी रस्ताही उखडला गेला.
महावितरणची उच्चदाबाची विजेची वाहिनी रस्त्याच्या काही इंच खाली टाकण्यात आली आहे. स्फोट झाला त्या वेळी जवळपास कोणीही नव्हते. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. स्थानिकांनी घटनेची माहिती लगेच महावितरण विभागाला दिली.
या घटनेमुळे स्वारगेट भागातील वीजप्रवाह खंडित झाला होता. पाऊस पडत असल्याने वीजप्रवाह पाण्यात उतरण्याची भीती होती. महावितरणने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.
वीजवाहिनी काही फूट खाली टाकणे अपेक्षित असताना फक्त काही इंचावरच वाहिनी कशी काय टाकण्यात आली असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. (प्रतिनिधी)