प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले!
By Admin | Updated: November 16, 2014 01:38 IST2014-11-16T01:38:02+5:302014-11-16T01:38:02+5:30
जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला. नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला.

प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले!
औरंगाबाद : मराठवाडय़ात गेल्या चोवीस तासात सर्वदूर मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद , जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड , हिंगोली आणि लातूर जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला.
नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. यात 32 मि.मी.च्या सरासरीने 448 मि.मी पावसाची नोंद झाली असून, तीन लाख हेक्टरवरील ज्वारीला जीवदान मिळाले आहे. काढणीला आलेल्या खरीप कांदा आणि सुरूवातीच्या टप्प्यात लावलेल्या कपाशीचे मात्र या पावसाने नुकसान झाले. या पावसामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईला दिलासा मिळणार असून, चारा पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
नाशकात पिकांना फटका
दोन दिवसांपासून नाशिक जिलत सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पोळ कांद्यासह द्राक्ष पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, कांद्यावर करपा तर द्राक्षावर डावण्या रोगाचा पादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साता:यात जोरदार हजेरी
सातारा शहरात शुक्रवारी रात्री नऊनंतर पावसाने झोडपून काढले. मध्यरात्री बारा वाजले तरी पावसाची संततधार सुरूच होती. महाबळेश्वरसह वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते; पण काल, शुक्रवारी मध्यरात्री व आज, शनिवारच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आह़े
सांगलीत द्राक्ष-डाळिंबाची हानी
सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात शनिवारी पावसाची रिमङिाम सुरू होती, तर खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यांत दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला आणि काढणी-मळणीला आलेल्या भातपिकाचेही नुकसान झाले आहे. ऊसतोडणीची कामे ठप्प झाल्याने हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.
नागपुरात ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.अशी स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)