शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:05 IST

मार्च २०१८ अखेर पैसे भरूनही मागणीनुसार वीज न मिळालेल्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

मुंबई : मार्च २०१८ अखेर पैसे भरूनही मागणीनुसार वीज न मिळालेल्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. डिसेंबर-२०१९ अखेरपर्यंत या सर्व शेतकºयांना महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल. या प्रणालीवर सुमारे ५ हजार ४८ कोटी रुपये खर्च केले जातील.उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे लवकरात लवकर वीजपुरवठा करावा, यासाठी अनेक शेतकºयांनी सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानुसार अशा शेतकºयांसाठी ग्राहकाधिष्ठित वितरण सुविधा अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यादृष्टीने महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे याचिका सादर केली होती. त्यावर सुनावणी घेत नुकतीच या याचिकेस मंजुरी देण्यात आली. यापूर्वी ही सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी आता राज्यातील काही शेतकºयांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आला आहे. राज्यातील शेतकºयांचा विकास व्हावा यासाठी शेतकºयांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने ही योजना अमलात आणण्यात आली.या प्रणालीमुळे शेतकºयांना दर्जेदार, अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रत्येक शेतकºयासाठी समर्पित रोहित्र असेल. या प्रणालीमुळे शेतकºयांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. शिवाय रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होईल. सोबतच तांत्रिक तसेच वाणिज्यिक हानीचे होणारे प्रमाण कमी होईल, असा विश्वास महावितरणकडून व्यक्त करण्यात आला आहे....यांना होणार लाभत्यानंतरच महावितरणद्वारे त्यांना नवीन वीजपुरवठा जोडून देण्यात येईल आणि लघुदाब वाहिनीवरून उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरित केले जाईल.कृषीपंपधारक शेतकºयाने कुठल्याही कारणास्तव कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यास त्या शेतकºयाला केलेल्या खर्चाच्या रकमेची परिपूर्ती घसारा पद्धतीनुसार करण्यात येईल.सध्या अस्तित्वात असलेल्या कृषीपंपधारक शेतकºयांना तसेच प्रलंबित यादीत असणाºया शेतकºयांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.ग्राहकाधिष्ठित वितरण सुविधेद्वारे वीजपुरवठा घेण्यासाठी लागणारी उच्चदाब वाहिनी व रोहित्राचा खर्च शेतकºयांना स्वत: करावा लागणार आहे.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र