शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सरकारची ग्वाही, खासगीकरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 08:27 IST

मागण्यांवर तीन ते चार दिवसांत कार्यवाही होईल. संपकऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही, या मुद्द्यांंसह ६ हायड्रो पॉवर स्टेशन खासगी कंपन्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती वीज कामगार संघटनेने दिली.

मुंबई : ऊर्जा कंपन्यांमध्ये खासगीकरण होणार नसल्याचे आश्वासन देतानाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संप स्थगित केला आहे, अशी माहिती वीज कामगारांच्या संघटनांनी दिली आहे.मागण्यांवर तीन ते चार दिवसांत कार्यवाही होईल. संपकऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही, या मुद्द्यांंसह ६ हायड्रो पॉवर स्टेशन खासगी कंपन्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती वीज कामगार संघटनेने दिली. बदली धोरणासंदर्भात एकतर्फी निर्णयावर विस्तृत निवेदन दिले जाईल. चर्चेशिवाय धोरण न राबवणे, कंत्राटी कामगारांना संरक्षण, भरतीत कंत्राटी कामगारांना प्राधान्य यावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही संघटनांनी सांगितले.तोट्यातून बाहेर कसे यायचे?२४ तास वीज मिळावी. महावितरण आर्थिक तोट्यातून कसे बाहेर काढता येईल, याबाबतचे काही प्रस्ताव ऊर्जामंत्र्यांनी वीज कामगार संघटनांकडून मागविले आहेत.४० हजार कोटींच्या व्यवहारांना फटकाया संपामुळे बँकांचे व्यवहार ठप्प होऊन राज्यातील सूक्ष्म आणि लघू उद्योगाच्या ३५ ते ४० हजार कोटींच्या व्यवहारांना फटका बसला. बाजारात रोखीचे व्यवहार जवळपास ठप्प  झाल्याचे दिसले. शनिवार ते मंगळवार चार दिवस बँका बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.१८,००० कोटी रुपयांचे धनादेश वटले नाहीतदेशव्यापी संपात बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग होते. यामुळे दुसऱ्या दिवशीही बँकिंग सेवांवर परिणाम झाला. देशभरात सुमारे १८,००० कोटींचे सुमारे २० लाख धनादेश वटले नाहीत. सरकारी कोषागाराच्या कामकाजावरही परिणाम झाला. एकट्या चेन्नईमध्ये ५ हजार कोटींचे ६ लाख धनादेश मंजुरीविना पडून आहेत.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत