शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

ऊर्जा मंत्र्यांचा बाजोरियांना शॉक!

By admin | Updated: July 26, 2016 02:10 IST

राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांना आज विधानभवनात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच झापले. ऊर्जा विभागाविरुद्ध तुमच्याकडे पुरावेच होते तर तुम्ही सभागृहात

मुंबई : राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांना आज विधानभवनात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच झापले. ऊर्जा विभागाविरुद्ध तुमच्याकडे पुरावेच होते तर तुम्ही सभागृहात तोंड का उघडले नाही, असे बावनकुळेंनी बाजोरियांना सर्वांसमक्ष सुनावले. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली पण भारी पडले ते बावनकुळेच.विधान परिषदेत आज नियम २६० नुसार विरोधी पक्षाने विविध विभागांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. या विभागांमध्ये बावनकुळे मंत्री असलेल्या ऊर्जा विभागाचादेखील समावेश होता. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अन्य विभागांवर आरोप केले तथापि, ऊर्जा विभागावर कोणीही बोलले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी सभागृहात अशी मागणी केली की माझ्या विभागाचे विरोधकांच्या प्रस्तावात नाव नाही, या विभागावर कोणी काही आरोपदेखील केलेला नाही तेव्हा प्रस्तावातून ऊर्जा विभागाचे नाव वगळावे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यास मान्यता दिली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी तसे निर्देशदेखील दिले. चर्चा व त्यावरील मंत्र्यांची उत्तरे संपल्यानंतर विधानभवनाच्या लिफ्टजवळ बावनकुळेंना बघून बाजोरिया त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी बोलू लागले. ऊर्जा विभागाचे माझ्याजवळ खूप पुरावे आहेत. मी एकेक काढू शकतो, असे ते म्हणाले. बावनकुळे यांनी तत्काळ आक्रमक होत बाजोरिया यांना धारेवर धरले. तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात, चर्चा झाली तेव्हाही सभागृहात होता मग तेव्हाच पुरावे द्यायला हवे होते. माझ्या खात्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असे बावनकुळे यांनी सुनावले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तितक्यात त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बाजोरिया यांना आवरले. (विशेष प्रतिनिधी)