शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सौभाग्य योजनेंतर्गत राज्यातील सहा हजारांहून अधिक घरांमध्ये पोहोचवणार वीज - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:28 IST

सौभाग्य योजनेअंतर्गत येत्या मार्च 2019 पर्यंत राज्यातील विद्युतीकरण झालेले नसलेल्या 6397 घरांना वीज कनेक्शन देऊन जोडण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्युतीकरण झाले नसलेल्या सर्व घरांना वीज कनेक्शन मिळावे म्हणून सौभाग्य योजना जाहीर केली होती. 

नागपूर - सौभाग्य योजनेअंतर्गत येत्या मार्च 2019 पर्यंत राज्यातील विद्युतीकरण झालेले नसलेल्या 6397 घरांना वीज कनेक्शन देऊन जोडण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्युतीकरण झाले नसलेल्या सर्व घरांना वीज कनेक्शन मिळावे म्हणून सौभाग्य योजना जाहीर केली होती. विधान परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देतान ऊर्जामंत्री बानकुळे यांनी सांगितले की,"विद्युतीकरण झाले नसलेल्या गावांतील घरांसाठी ही योजना असून सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. नागपुरात सौभाग्य या योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन येत्या 23 डिसेंबर रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंग यांच्या हस्ते होत आहे. वीज कनेक्शन नसलेल्या घरांना वीज देण्यासाठी 1100 कोटींचा आराखडा राज्याने केंद्र शासनाला सादर केला आहे. ज्या ठिकाणी वीज पोहोचली आहे, अशा ठिकाणी महावितरण काम करणार तर वीज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी महाऊर्जा काम करणार आहे. विद्युतीकरण होऊ शकणार नाही अशा घरांना 65 हजार रुपयांचा एक कीट देण्यात येणार आहे. त्यातून एका घरात लाईट, पंखे, टीव्ही या वस्तूंना वीजपुरवठा होईल. याचे ऑनलाईन देखभाल होईल." आ. प्रकाश गजभिये यांनी सौभाग्य योजना, वाड्या पाड्यांना वीज कनेक्शन, कोळसा टंचाई, भारनियमन, खाजगी वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करणे यासारख्या विविध विषयांवर लक्ष्यवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांना ऊर्जामंत्र्यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. आ. प्रकाश गजभिये यांनी सौभाग्य योजना, वाड्या पाड्यांना वीज कनेक्शन, कोळसा टंचाई, भारनियमन, खाजगी वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करणे यासारख्या विविध विषयांवर लक्ष्यवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. ज्या 111 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले नाही. त्यापैकी महावितरणतर्फे 2017-18 मध्ये 54 गावांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. 57 गावांचे विद्युतीकरण महाऊर्जातर्फे करण्यात येईल. ऑक्टोबर 2017 अखेरपर्यंत महावितरणने 54 पैकी 14 गावांचे तर महाऊर्जातर्फे 57 पैकी 28 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे, असे ऊर्जामंत्री यांनी सांगितले. कोळसा टंचाईच्या प्रश्नावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, खाजगी कंपनीकडून शासन कोळसा विकत घेत नाही. परदेशातून कोळसा आयात करणे बंद केले आहे. केंद्र शासनाच्या कोळशा कंपन्यांकडूनच कोळसा घेतला जातो. मध्यंतरी एसईसीएल कोळसा खाणीत पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. 3 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान महानिर्मितीला व खाजगी वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनाही कोळसा मिळू शकला नाही. परिणामी भारनियमन करावे लागले. अदानी कंपनीशी 10 वर्षापूर्वीच वीज खरेदीचा करार करण्यात आला होता. या कंपनीलाही कोळसा उपलब्ध झाला नाही. त्या काळात 3.75 रुपये या दराने वीज घेऊन राज्यात वीजपुरवठा करण्यात आला. आता मात्र भारनियमन नाही. शेतकर्‍यांना फक्त 8 तास वीजपुरवठा केला जातो. अन्य वेळी वीज बंद केली जाते ते भारनियमन नाही. वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीजपुरवठा बंद केला जातो, ते भारनियमन नाही. शेतकर्‍यांकडे 22 हजार कोटी वीजबिलाची थकबाकी आहे. यातील दंड व व्याज बाजूला ठेवून मूळ रकमेचे 5 भाग करण्यात आले. 30 हजार रुपये थकबाकी असेल तर 3 हजार रुपये भरायला सांगण्यात आले. 30 हजारापेक्षा अधिक थकबाकी असेल तर 5 हजार प्रथमत: भरले तर वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे सांगताना ऊर्जामंत्र्यांनी आ. जयंत टकले यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, राज्यातील महागडे व जुने संच बंद करण्यात येत आहेत. भुसावळ, नाशिकचे संच जुने आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यापुढे सर्व संच सुपर क्रिटिकल तंत्राचे राहणार आहेत. तसेच महापारेषणची क्षमता 15 हजार मेगावॉटने 3 वर्षात वाढविली असून 20 हजार मेगवॉटपर्यंत ही क्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी 8 हजार कोटींचा खर्च आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा आधुनिक करण्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आहे, याकडेही ऊर्जामंत्र्यांनी लक्ष वेधले. या लक्ष्यवेधीच्या चर्चेत आ. जयंत पाटील, आ. प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न विचारले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र