...तर देशातील गरिबी दूर होईल - अनिल काकोडकर
By Admin | Updated: May 10, 2014 21:08 IST2014-05-10T19:41:37+5:302014-05-10T21:08:24+5:30
देशातील गरिबी दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. असेच प्रयत्न देशातील वैज्ञानिकांनी केले. आपल्या जबाबदार्या पार पाडल्या. तर देशातील गरिबी दूर होण्यास मदत होईल.

...तर देशातील गरिबी दूर होईल - अनिल काकोडकर
मुंबई : देशातील गरिबी दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. असेच प्रयत्न देशातील वैज्ञानिकांनी केले. आपल्या जबाबदार्या पार पाडल्या. तर देशातील गरिबी दूर होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे सरकारदेखील याकामाची दखल घेईल, असे उद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे काढले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने चुनाभी येथे आयोजित कार्यक्रमात अनिल काकोडकर बोलत होते. ते म्हणाले, आपल्या देशातील वैज्ञानिक अनेक वर्षे खूप मेहनत करून संशोधन करतात. मात्र काही वेळेला त्यांनी केलेले संशोधन समोर येत नाही. त्यामुळे आपण केलेल्या संशोधनाची माहिती वैज्ञानिकांनी कोणापर्यंत तरी घेऊन जाणे आवश्यक आहे. आणि असे केले तरच देशातील तंत्रज्ञानात भर पडेल.
आपल्याकडे शिक्षकांना योग्य वेतन नाही. देशातील बँकेचे व्याजदर खूप आहेत. काही उद्योग सुरु करावयाचा म्हटल्यास शासनाची बंधने आहेत. त्यामुळे देशाची प्रगती होत नाही, अशी ओरड सर्वसामान्यांकडून केली जाते. परंतू इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील शिक्षक वेतनाच्या तुलनेत चौथ्या क्रमांकावर आहेत. यात आपण अमेरिकेलादेखील पाठी टाकले आहे; सध्या अमेरिकेचा क्रमांक पाचवा आहे. त्यामुळे आपल्या देशातील शिक्षकांना कमी वेतन मिळते; हा गैरसमज आहे, असेही काकोडकर यांनी आर्वजून सांगितले. (प्रतिनिधी)
..................