वसईतील नव्या रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे
By Admin | Updated: July 4, 2016 03:55 IST2016-07-04T03:55:14+5:302016-07-04T03:55:14+5:30
वसई रेल्वे उड्डाणपूलावरून वाहतूक सुरु होऊन अजून आठवडा लोटला नाही तोच पूलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.

वसईतील नव्या रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे
वसई : तब्बल पाच वेळा झालेल्या उद्घाटनामुळे चर्चेत असलेल्या वसई रेल्वे उड्डाणपूलावरून वाहतूक सुरु होऊन अजून आठवडा लोटला नाही तोच पूलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्या पूलावरून आता नवा वादंग सुरु होण्याची शक्यता आहे. याच पूलाच्या शेजारी असलेल्या जुन्या पूलावरही खड्डे पडल्याने वाहतूकीला अडथळे येऊ लागले आहेत.
वसई रोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या एकमेव छोट्या उड्डाणपूलामुळे प्रचंड वाहतूककोंडी असल्याने एमएमआरडीएने शेजारीच नवा रेल्वे उड्डाणपूल बांधला आहे. मात्र, उड्डाणपूलाचे काम रखडून पडल्याने वसईकरांना तब्बल नऊ वर्षे प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर उद्घाटनावरून राजकीय वादंग निर्माण झालेल्या उड्डाणपूलाचे गेल्या शनिवारी रितसर उद्घाटन होऊन त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. शुक्रवारपासून पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याच्या शेजारी असलेला जूना पूल व दोन्ही पूलांना जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.
खड्डे वाचवण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत असून त्यातून अपघात होण्याची भिती व्यत करण्यात येत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे पुन्हा वाहतूककोंडीला नियंत्रण मिळाल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)