शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षेपातील तांत्रिक त्रुटीमुळे  चांद्रयान 2 मोहीम स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 16:31 IST

प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली..

ठळक मुद्दे10 दिवसांत शोधणार बिघाड : जीएसएलव्हीच्या इंधनाच्या टाकीत दोष चांद्रयान 2 मोहीम यापूर्वीही दोन वेळा स्थगित

- निनाद देशमुखश्रीहरिकोटा : जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतिक्षित चांद्रयान 2 मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क 3 च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे प्रक्षेपणापूर्वी प्रक्षेपकाची तपासणी करताना ही त्रुटी आढळल्याने मोहीम प्रमुखांनी मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. येत्या 10 दिवसांत बिघाडाच्या कारणांची तपासणी करून त्यानंतर प्रक्षेपणाची पुढील तारीख इस्रोतर्फे जाहीर करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.  '' चांद्रयान 2 '' चे प्रक्षेपण सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी करण्यात येणार होते. त्यासाठी काऊंटडाऊनही सुरू झाले होते. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली. या प्रक्षेपणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचबरोबर जवळपास 5 हजार जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  जगभरातून या प्रक्षेपणाचे वार्तांकन करण्यासाठी अनेक नामांकित वृत्त समूहांचे प्रतिनिधीही या ठिकाणी उपस्थित होते. रविवारी सकाळी प्रक्षेपकात इंधन भरल्यावर इस्रोचे शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टींकडे लक्ष ठेऊन होते. प्रक्षेपणात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते. रात्री 10 वाजता चेन्नई येथून हा सोहळा जगभरात दाखवण्यासाठी विशेष गाडीतून पत्रकारांना श्रीहरीकोटा येथे नेण्यात आले. दरम्यान, सकाळपासून प्रक्षेपणाची उलटी गणती सुरू करण्यात आली होती.मुख्य कंट्रोलरूममधून शास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाची माहिती देत होते. शास्त्रज्ञांची तयारी पाहण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रपती नियंत्रण कक्षात उपस्थित होते. २ वाजता प्रक्षेपणाला 56.24 सेकंद उरले होते. यावेळी मोहीम प्रमुखांना प्रक्षेपकाच्या इंधनाच्या टाकीत त्रुटी आढळली. यामुळे प्रक्षेपण काही काळापुरते होल्डवर ठेवण्यात आल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. परंतु मोहीम सुरू होण्यापूर्वीच इस्रोच्या शास्त्रज्ञांना ही तांत्रिक त्रुटी मोठी असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.-----इस्रोचे अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की प्रक्षेपणाच्या दरम्यान शास्त्रज्ञांना प्रक्षेपकात काही त्रुटी आढळल्या. यामुळे प्रेक्षपण स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांत नवी तारीख जाहीर करण्यात येईल.----- 

छोटीशी चूकही ठरू शकते धोकादायक!

अंतराळात यान सोडण्याच्या कुठल्याही मोहिमेत मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जाते. कारण छोट्याशा त्रुटींमुळे अपघाताची शक्यता असते.  चांद्रयान 2 मोहीम भारताची महत्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ गेल्या 11 वर्षांपासून  झटत आहेत. या मोहिमेसाठी जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहे. यामुळे थोडीही त्रुटी ही संपूर्ण मोहीम उदध्वस्त करू शकते. असे झाल्यास येणाऱ्या मोहिमांवर तसेच मनोबलावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळेच तूर्तास यानाचे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले आहे. चांद्रयान 2 मोहीम यापूर्वीही दोन वेळा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत तांत्रिक बिघाड शोधून नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो