शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:40 IST

Nilesh Lanke on Police Recruitment: यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे.

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच १९ जूनपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे.

यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. तसेच, पाऊस सुरू असल्यामुळे पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील १७ हजार ४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी १७ हजार ४७१ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

अहमदनगरमध्ये पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणारअहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, बँड पथक आणि चालक पदांसाठी उद्या (१९ जून) पहाटे पाच वाजल्यापासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस दलातील शिपाई २५, तर चालकाच्या ३९ जागा रिक्त आहेत. यातील पोलीस शिपाई पदासाठीच्या २५ जागांपैकी तीन जागा बैंड पथकासाठी राखीव आहेत.

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरी