शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:08 IST

स्मार्ट बायका कुठे जातात अशी आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले.

ठळक मुद्देपिंपरीत लागले फलक : नागरिकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण प्रेमवीराच्या पोस्टरनंतर शहरात आणखी एक प्रताप  

पिंपरी :  एका प्रेमवीराने प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरात फलेक्सबाजी केल्याचा विषय चर्चेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच, स्मार्ट बायका कुठे जातात अशा आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले. महिलांबद्दल अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या जाहीर कृतींमुळे शहर वेगळ्या अर्थाने चर्चेत आले असून सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. खंडोबा माळ चौक, आकुर्डी, तसेच साने चौक चिखली या परिसरात वर्दळीच्या ठिकाणी ‘स्मार्ट बायका जातात कुठे’ अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. दर्शनी ठिकाणी हे फ्लेक्स  असल्याने सहज नजरेत येत आहेत. स्मार्ट बायका जातात कुठे हे मोठ्या आकारातील अक्षरात लिहिलेले आहे. त्या मजकुराखाली या जागेवर लक्ष ठेवा, १५ आॅक्टोबर असेही लिहिले आहे. कापड विक्री दुकानदार अथवा ब्युटी पार्लर दुकानाची जाहिरात असावी, जाहिरात आकर्षक ठरावी, या उद्देशाने जरा हटके शब्दांकन करण्याची शक्कल लढविल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हे फ्लेक्स कोणी लावले ?  महापालिकेच्या आकाशचिन्ह परवना विभागाकडून परवानगी घेतली आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. नवरात्रोत्सव अर्थात दुर्गा उत्सव सुरू असताना, महिलांच्यादृष्टीने अवमानकारक ठरेल असे फलक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला  बाधा पोहोचू शकते, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रेयसीची माफी मागण्यासाठी ‘शिवडे आय एम सॉरी’ अशा आशयाचे तब्बल तीनशे हे फ्लेक्स पिंपळे सौदागरच्या रस्त्यावर, चौकाचौकात लावल्याचा प्रकार मागील महिन्यात उघडकीस आला होता. प्रेयसीची माफी मागण्यासाठी भर चौकांमध्ये फ्लेक्स लावल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवुन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र फ्लेक्स   लावल्याची माहिती  शहरभर पसरताच तातडीने प्रेमवीराने प्रेयसीची माफी मागण्यासाठी लावलेले फ्लेक्स काढून घेतले होते. त्यामुळे अनधिकृत हे फ्लेक्सवर कारवाईचा प्रश्न उद्भवला नाही. शिवाय मुलीच्या नावाचा उल्लेख नसल्याने कोणाही तरूणीची तक्रार नसल्याने प्रेमवीरावर काहीच कारवाई झाली नाही. हा मुद्दा शहरात बहुचर्चित ठरला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल