शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरचे वारसदार उपेक्षित

By admin | Updated: September 21, 2014 03:03 IST

ओशिएन्स ग्रुपने आयोजित केलेल्या लिलावात अभिनेता शाहरूख खान याने ‘मुघल-ए-आजम’ या अतिभव्य चित्रपटाच्या मूळ पोस्टरच्या कलाकृती 6 लाख 84 हजार रुपयांना विकत घेतल्या.

शाहरूखकडून अपेक्षा : लिलावात दुस:यानेच केली कमाई, जी. कलायोगी यांच्या मुलांची दैन्यावस्था
संदीप आडनाईक - कोल्हापूर
ओशिएन्स ग्रुपने आयोजित केलेल्या लिलावात अभिनेता शाहरूख खान याने ‘मुघल-ए-आजम’ या अतिभव्य चित्रपटाच्या मूळ पोस्टरच्या कलाकृती 6 लाख 84 हजार रुपयांना विकत घेतल्या. मात्र, मुघल-ए-आजमचे मूळ पोस्टर ज्यांनी तयार केले त्या जी. कलायोगी या कलाकाराच्या वारसदारांच्या हाती काही लागलेले नाही. 
1960मध्ये प्रदर्शित झालेला के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल-ए-आजम’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने अनेक नवे पायंडे हिंदी चित्रपटसृष्टीत पाडले. 1960मध्ये आलेला हा चित्रपट चालेल की नाही, या भीतीपोटी निर्माता शापुरजी पालोनजी यांनी लंडनहून या चित्रपटाच्या 150 प्रिंट्स मागवून त्या एकाच दिवशी देशभर प्रदर्शित केल्या. 
‘मुघल-ए-आजम’ या चित्रपटाच्या पोस्टरसाठी मुंबईतील अनेक कलाकारांची चित्रे के. असिफ यांनी पाहिली; पण त्यांना ती पसंत पडली नाहीत. म्हणून रोमच्या कलाकारांना त्यांनी निमंत्रण दिले होते. तेव्हा मुंबईतील कलाकारांनी हे मोठे काम भारतातून जाऊ नये म्हणून कोल्हापुरातील चित्रकारांकडे धाव घेतली. जी. कलायोगी हे तेव्हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांसाठी पोस्टर्स बनवित असत. त्यामुळे जी. कलायोगी यांचे मुंबईतील शिष्य अंकुश यांनी या पोस्टर्ससाठी जी. कलायोगी यांना साकडे घातले. जी. कलायोगी तेव्हा व्ही. शांताराम यांच्या एका चित्रपटाचे पोस्टर्स करण्यात गुंतले होते. तरीही त्यांनी के. असिफ यांच्या मनातील मुघल-ए-आजम चित्रपटासाठी एक स्केच तयार करून ते मुंबईला मोहन स्टुडिओत पाठविले.
के. असिफ यांनी हे स्केच त्यांच्या सवडीने पाहिले मात्र तत्काळ त्यांनी जी. कलायोगी यांचा शोध घेतला. तेव्हा कोल्हापुरातील उमा टॉकिजचे मालक नाना इंगळे (पान 4 वर)
 
(पान 1 वरून) यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. इंगळे यांनी लगेचच जी. कलायोगी यांना बोलावून घेतले. के. असिफ यांनी फोननवरून त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. कलायोगी यांनी दुस:याच दिवशी मुंबई गाठली. त्यांच्यासोबत त्यांचे दोघे मित्र आणि नातेवाईक यशवंतराव घोटणो होते.
वांद्रे येथील दिलीपकुमार यांच्या बंगल्यावर के. असिफ आणि जी. कलायोगी यांची भेट झाली. त्यांनी दुस:या दिवशी अकरा वाजता अंधेरीच्या त्यांच्या स्टुडिओत भेटायला बोलावले. दुस:या दिवशी जी. कलायोगी स्टुडिओत गेले. त्यांनी आणखी काही स्केच काढून दाखविले. ते के. असिफ यांना पसंत पडताच त्यांनी कलायोगी यांना मुंबईतच राहायला बोलावले. त्यानंतर जवळजवळ अडीच वर्षे जी. कलायोगी मुंबईतल्या स्टुडिओच्या आवारातच राहत होते. त्यांच्यासाठी के. असिफ यांनी स्वतंत्र सोवळेकरीही नेमला होता. 
जी. कलायोगी यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही तेथे राहायला गेले. कलायोगी यांनी मुघल-ए-आजमची असंख्य पोस्टर्स तयार केली. या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर शो तेव्हा मराठा मंदिरात झाला. मराठा मंदिरचाही तो पहिलाच चित्रपट होता. के. असिफ यांनी मराठा मंदिर थिएटरवर दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या एका प्रेमदृश्याचे भव्य पोस्टर लावले होते. ते सा:यांचेच लक्ष वेधून घेत होते. या पोस्टरशिवाय पाच तोळे सोन्याचा मुलामा दिलेले 15 फुटी पितळेच्या थाळीवर चितारलेले पोस्टरही लोक रांगा लावून पाहत असत.
मुळात नेविन टुली या चित्रसंग्राहकाने जी. कलायोगी यांच्याकडूनच या मूळ पोस्टर्स्चे छायाचित्र नेले होते. ते छायाचित्र कोल्हापुरातील जी. कलायोगी यांचे शिष्य रियाज शेख यांनीच टुली यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्याबद्दल अवघे पाचशे रुपये टुली यांनी शेख यांच्या हातावर टेकविले होते. यानंतर जेव्हा मुघल-ए-आजम चित्रपट के. असिफ यांचे चिरंजीव अकबर यांनी रंगीत केला, तेव्हा झाडून सारे कलाकार मुंबईत आले होते. तेव्हाही जी. कलायोगी यांच्याच मुघल-ए-आजमच्या मूळ पोस्टरवर टुली यांनी दिलीपकुमार आणि शाहरुख खान यांच्या स्वाक्ष:या घेतल्या आणि प्रसिद्धी मिळविली होती.
 
1भव्य पोस्टर्स पाहूनच अॅडव्हान्स बुकिंगसाठी रांग लागली होती. लोक स्वयंपाकाची भांडी आणि स्टोव्ह घेऊनच रांगेत थांबत होते. पोस्टर पाहण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की, मुंबई सेंट्रलची वाहतूक जाम व्हायची, अशी माहिती कलायोगी यांचे चिरंजीव अशोक कांबळे सांगतात.
 
2 राणी एलिझाबेथ यांच्या भारत दौ:यात त्यांना दिल्लीत मुघल-ए-आजमचे पोस्टर दिसले. त्यांनी हा चित्रपट पाहण्याचा आग्रह जवाहरलाल नेहरू यांच्याकडे धरल्याची आठवण कांबळे यांनी सांगितली. नेहरू यांनी हा चित्रपट तेव्हा जयपूर येथे राणी एलिझाबेथ यांना दाखविला.
3अशा या कलाकाराला ‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरसाठी ठरलेली रक्कम मिळाली नव्हती, हे दुर्दैव. मात्र, आज याच पोस्टरसाठी एका लिलावात सहा लाखांहून अधिक रक्कम मिळते; पण ती त्यांच्या मूळ कलाकाराच्या वारसांना मिळत नाही.
 
कलायोगींचे चिरंजीव हलाखीत
शाहरूख खान यांना ‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरबद्दल इतके प्रेम असेल आणि त्याची किंमत त्यांना अदा करायची असेल, तर त्यांनी या चित्रपटाची मूळ पोस्टर्स ज्यांनी तयार केली, त्या जी. कलायोगी यांच्या हलाखीत जगणा:या त्यांच्या चिरंजिवांना आर्थिक मदत द्यावी.
- रियाज शेख, जी. कलायोगी यांचे शिष्य 
 
आर्ट गॅलरी चालवून उदरनिर्वाह
आज जी. कलायोगी यांचे थोरले चिरंजीव अशोक हे जी. कलायोगी यांच्या नावाने कोल्हापुरात सुरू केलेली आर्ट गॅलरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ते आज 60 वर्षाचे आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव शांताराम हे डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट आहेत, तर तिसरे चिरंजीव दिलीप हे एका बँकेत शिपाई आहेत.