‘डाक सहायक’ भरतीत घोळ
By Admin | Updated: February 19, 2015 01:53 IST2015-02-19T01:53:26+5:302015-02-19T01:53:26+5:30
डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.

‘डाक सहायक’ भरतीत घोळ
औरंगाबाद : डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.
पहिल्या यादीत निवड होऊन नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतरही दुसऱ्या यादीतून उमेदवारांची नावे वगळण्यात आली आहेत. डाक सहायक व सॉर्टिंग सहायक पदासाठी गेल्या वर्षी २१ मे रोजी लेखी परीक्षा झाली होती. राज्यभरातील सुमारे साडेचार लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान संगणकीय पात्रता परीक्षा झाली. त्यात साडेसात हजार उमेदवार पात्र ठरले. परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. संस्थेने ८ जानेवारीला निकाल जाहीर केला. निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्याने नियुक्तीचे पत्रही दिले. मात्र १६ फेब्रुवारीला अचानक निकाल बदलण्यात आला. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. त्यातून ४५० वर उमेदवारांची नावे गायब होती. त्यांच्या जागेवर परराज्यांतील उमेदवारांची नावे आहेत. संबंधित घोटाळ््याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी विनायक भुजबळ, शिवप्रसाद मोहिदे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
च्औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. पी. एस. रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत कानावर हात ठेवले आहेत.
च्मी काही बोलू शकत नाही. मी शहराबाहेर आहे, असे सांगून त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.