काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत 'मत चोरी' झाल्याचा आरोप केला. काँग्रेसने निवडणूक विश्लेषक आणि लोकनीती-सीएसडीएस समन्वयक संजय कुमार यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केलेल्या ट्विटचा आधार घेऊन आयोगावर आरोप केले होते. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संजय कुमार यांनी हे ट्विट डिलिट करत माफी मागितली आहे.
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती
संजय कुमार यांनी या पोस्टमध्ये महाराष्ट्र विधानसभा जागांवर कमी मतांची माहिती दिली होती. एक्स वरची ही पोस्ट डिलीट केल्यानंतर संजय कुमार यांनी माफीही मागितली आहे. 'त्यांच्या टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला होता', असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी १७ ऑगस्ट रोजी हे ट्विट केले होते. भाजपने संजय कुमार यांनी पोस्ट डिलिट केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली. 'ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात', असेही भाजपाने म्हटले.
संजय कुमार काय म्हणाले?
'लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दोन जागांवर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे', असा दावा संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये केला होता. 'महाराष्ट्रातील विधानसभा क्रमांक ५९ रामटेकमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चार लाख ६६ हजार २०३ मतदार होते. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या दोन लाख ८६ हजार ९३१ पर्यंत कमी झाली, असे या पोस्टमध्ये संजय कुमार यांनी म्हटले होते.
संजय कुमार यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जागेवर एक लाख ७९ हजार २७२ म्हणजेच ३८.४५ टक्के मते कमी झाली. त्याचप्रमाणे त्यांनी देवळाली विधानसभा जागेचा डेटा दिला होता. त्यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्रमांक १२६ देवळालीमध्ये चार लाख ५६ हजार ७२ मते होती. तर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या दोन लाख ८८ हजार १४१ पर्यंत कमी झाली. संजय कुमार यांच्या मते, देवळाली मतदारसंघावर एक लाख ६७ हजार ९३१ म्हणजेच ३६.८२ टक्के मते कमी झाली.
संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र निवडणुकीवरील त्यांच्या ट्विटबद्दल माफी मागितली. ती पोस्टही त्यांनी डिलिट केली. "महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित ट्विटबद्दल मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना चूक झाली. आमच्या डेटा टीमने डेटा चुकीचा वाचला. ट्विट डिलीट करण्यात आले आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजपाने केली टीका
भाजपने संजय कुमार यांच्या या कृतीवर टीका केली. पक्षाने ही एक प्रामाणिक चूक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, "माफी मागितली आहे आणि संजय कुमार बाहेर आहेत. योगेंद्र यादव यांच्या या शिष्याने शेवटचे कधी काहीतरी बरोबर केले होते? प्रत्येक निवडणुकीपूर्वीच्या त्यांच्या सर्व भाकिते भाजपला हरवतात आणि जेव्हा दावा उलटा पडतो तेव्हा ते टीव्हीवर येऊन भाजप कसा जिंकला हे स्पष्ट करतात. त्यांना टीव्ही प्रेक्षक मूर्ख आहेत असे वाटते" मालवीय यांनी लिहिले, "काँग्रेसच्या महाराष्ट्राबद्दल खोटे कथन पसरवण्याच्या उत्सुकतेत, सीएसडीएसने पडताळणीशिवाय डेटा जारी केला. हे विश्लेषण नाही - ते स्पष्टपणे पक्षपाती आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये मालवीय यांनी लिहिले की, "महाराष्ट्रातील मतदारांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधी ज्या संस्थेच्या डेटावर अवलंबून होते, त्यांनी आता कबूल केले आहे की त्यांचा डेटा चुकीचा होता, केवळ महाराष्ट्राचाच नाही तर एसआयआरचाही."