३१ जानेवारीला निघणारा मराठा मोर्चा लांबणीवर
By Admin | Updated: January 15, 2017 20:39 IST2017-01-15T18:06:57+5:302017-01-15T20:39:25+5:30
मुंबईत निघणाऱ्या मराठ्यांच्या राज्यव्यापी महामोर्चासंदर्भात मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यव्यापी बैठक नुकतीच

३१ जानेवारीला निघणारा मराठा मोर्चा लांबणीवर
> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुंबईत निघणाऱ्या मराठ्यांच्या राज्यव्यापी महामोर्चासंदर्भात मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यव्यापी बैठक नुकतीच वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे पार पडली. त्यात ३१ जानेवारी रोजी मुंबईत निघणारा महामोर्चा पुढे ढकलून 6 मार्चला काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तत्पूर्वी मराठा मोर्चाचे आजोजन 23 मार्चला करण्याचे ठरले होते. पण नंतर ही तारीख बदलून 6 मार्च रोजी मुंबईत मोर्चा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
31 जानेवारीला निघणाऱ्या मोर्चाऐवजी आता त्या दिवशी राज्यात चक्काजाम करण्यात येणार आहे. त्या दिवशी मराठा समाज मुकपणा आंदोलन करून सरकारला इशारा देईल, असे मराठा मोर्चाच्या समन्वय समितीने सांगितले. मुंबईसह राज्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व आचारसंहिता लक्षात घेऊन तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय बैठकीत सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी मोर्चासंदर्भात विविध मते मांडली. अखेर सर्वानुमते मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या बैठकीत मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर या नजीकच्या जिल्ह्यांसह अमरावती, अकोला आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३१ जानेवारीला मोर्चा काढावा की नाही, यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींनी आपले मत मांडले. अखेर बहुतांश जिल्हा प्रतिनिधींच्या विनंतीमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला.