‘नरबळी घटनेमागे सूत्रधाराची शक्यता’
By Admin | Updated: November 19, 2014 04:49 IST2014-11-19T04:49:14+5:302014-11-19T04:49:14+5:30
रुपेश मुळे नरबळी प्रकरण महाराष्ट्रातील माणुसकीला कलंक लावणारी घटना आहे. या घटनेमागे सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘नरबळी घटनेमागे सूत्रधाराची शक्यता’
वर्धा : रुपेश मुळे नरबळी प्रकरण महाराष्ट्रातील माणुसकीला कलंक लावणारी घटना आहे. या घटनेमागे सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधश्रद्धेतून केलेल्या या अमानवीय कृत्याबद्दल आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, या दृष्टीने पोलिसांनी पुढील तपास करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ता आ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आ. गोऱ्हे मंगळवारी वर्धेत आल्या होत्या. त्यांनी रुपेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
तसेच पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याशीही प्रकरणाशी संबंधित बाबींवर सखोल चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असावेत, असे रूपेशचे कुटुंबीय सांगत आहे. या दिशेने पोलिसांनी पुढील तपास करण्याची नितांत गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)