शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, देसाईंना संधी नाकारल्याने शिवसेनेची दोन मंत्रिपदे रिक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:02 IST

देसाई यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत ते मंत्रिपदावर राहू शकतात. त्यानंतरही त्यांना मंत्री म्हणून कायम राहायचे तर दोन पर्याय आहेत.

मुंबई : शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना विधान परिषदेची संधी नाकारण्यात आल्याने आता त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह आहे. त्यातच संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रिपद आधीपासूनच रिक्त आहे. या शिवाय, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद देखील रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात नजीकच्या काळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. देसाई यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत ते मंत्रिपदावर राहू शकतात. त्यानंतरही त्यांना मंत्री म्हणून कायम राहायचे तर दोन पर्याय आहेत. एक तर त्यांना कोण्या एका सभागृहाचे पुन्हा सदस्य व्हावे लागेल किंवा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा नव्याने मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री फौजिया खान यांच्याबाबत आधीच्या आघाडी सरकारमध्ये तसे घडले होते. तथापि, देसाई यांच्याबाबत पक्षनेतृत्व तशी भूमिका घेण्याची शक्यता नाही. त्यांना मंत्रिपदी कायम ठेवायचे असते तर आताच पुन्हा विधान परिषदेची संधी दिली असती असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असून पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विभागीय संतुलनाचा विचार करता विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही. - अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा  दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्यात आले. - वळसे यांच्याकडे त्या आधी असलेले उत्पादन शुल्क खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर कामगार खाते हे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले होते. - नवाब मलिक हे कोठडीत असले तरी बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम आहेत. त्यांच्याकडील अल्पसंख्याक विकास खाते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तर कौशल्य विकास खाते हे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. 

- मलिक यांना मंत्रिपदावर पुढेही कायम ठेवले जाईल का या बाबत साशंकता आहे. त्यांच्या जागी नवीन चेहरा नजीकच्या काळात दिला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्र