राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
By Admin | Updated: July 20, 2016 11:13 IST2016-07-20T11:13:55+5:302016-07-20T11:13:55+5:30
येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20- राज्यात गेले काही विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
पश्चिम समुद्र किनाऱ्यावर दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.२० ते २३ जुलै या काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल.२० ते २१ जुलै या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.
दरम्यान मंगळवारी मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला अक्षरश: झोडपून काढले. सकाळी सुरू झालेल्या जलधारांनी सायंकाळपर्यंत कायम ठेवलेल्या माऱ्यामुळे धावत्या मुंबईला किंचितसा ब्रेक लागला आणि दिवसभर पडलेल्या पावसाची शहरात ४६.७०, पूर्व उपनगरात ३५.४५ आणि पश्चिम उपनगरात ३०.९४ मिलीमीटर नोंद झाली. या नोंदीनुसार उपनगराच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र होते.