स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता
By Admin | Updated: October 20, 2016 15:18 IST2016-10-20T15:18:47+5:302016-10-20T15:18:47+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सर्व शिवसेना पदाधिकारी हजर होते. बैठकीत उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय झाला असला तरीही मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार की भाजपासोबत युती करणार हे पाहावं लागेल.