छोटा राजनला अजमल कसाबच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2015 18:29 IST2015-10-29T17:56:06+5:302015-10-29T18:29:04+5:30
कुख्यात डॉन छोटा राजनला भारतात आणल्यानंतर २६/११च्या हल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलेल्या कोठडीत ठेवण्याची शक्यता आहे.

छोटा राजनला अजमल कसाबच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - कुख्यात डॉन छोटा राजनला भारतात आणल्यानंतर २६/११च्या मुंबई हल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलेल्या कोठडीत ठेवण्याची शक्यता आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या पोलीसांनी रविवारी अटक केलेल्या छोटा राजनला भारतात आणण्याची प्रक्रिया सीबीआयकडून सुरु आहे. त्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील ऑर्थर रोडच्या तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या तुरुंगात २६/११च्या मुंबईतील हल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्याच कोठडीत त्याला ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.
राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यावर ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला इंडोनेशियात पकडण्यात आल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई पोलिसांकडून छोटा राजनची फाईल मागितली असून एकूणच छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी किमान वीस दिवस लागू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.