दारू प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: March 2, 2017 05:10 IST2017-03-02T05:09:44+5:302017-03-02T05:10:07+5:30
आरोपी अजित उर्फ नन्ना गुलराज सेवानी याला मंगळवारी मुंबई पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले़ त्याला मंगळवारी रात्रीच नगर पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.

दारू प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होणाऱ्या बनावट दारूसाठी लागणाऱ्या बाटल्यांना झाकणे पुरविणारा आरोपी अजित उर्फ नन्ना गुलराज सेवानी याला मंगळवारी मुंबई पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले़ त्याला मंगळवारी रात्रीच नगर पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तेरा जणांना ताब्यात घेतले आहे़ पांगरमल पार्टीत नऊ जणांचा बळी घेणारी देशी दारू पुरविणारा याकूब अद्याप हाती लागलेला नाही. पोलिसांनी बनावट दारूप्रकरणी अटकेत असलेल्या जाकीर शेख, जितू गंभीर, सोनू दुग्गल, मोहन दुग्गल, हमीद शेख, भरत जोशी यांच्याकडून अजित सेवानी याच्याविषयी माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी सेवानी याच्या तारकपूर येथील घरात छापा मारला तेव्हा तो पसार झालेला होता़ तो मुंबईत लपल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली होती़ याबाबत मुंबईच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली होती़ मुंबई पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून सेवानीला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
>झाकणांचा मोठा पुरवठादार : नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट दारू तयार करण्याचे अड्डे आहेत़ या अड्ड्यांवर देशी दारूसह विदेशी ब्रॅण्डची बनावट दारूही तयार केली जाते़ ही दारू भरण्यासाठी लागणाऱ्या बाटल्यांना झाकणे पुरविण्याचे काम सेवानी करत होता़ उल्हासनगर येथून हा झाकणे खरेदी करून नगरमध्ये वितरीत करत होता़

याकूब पकडल्यानंतरच माहिती
पांगरमल येथे बनावट दारूचे किती बॉक्स गेले या साऱ्या घटनांचा पोलिसांना तपास लागलेला आहे़ आता देशी दारूत आढळून आलेले मिथेनॉल कोठून आले़ याचा तपास सुरू असून, मुख्य आरोपी याकूब शेख सापडल्यानंतरच त्याचा छडा लागणार आहे़