अश्लील चित्रफितीचा लातुरात बळी
By Admin | Updated: March 18, 2015 01:25 IST2015-03-18T01:25:22+5:302015-03-18T01:25:22+5:30
महिलेचा मंगळवारी लातुरात मृत्यू झाला़ या खळबळजनक घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़
अश्लील चित्रफितीचा लातुरात बळी
लातूर : अश्लिल चित्रफितीचा धाक दाखवून शरिरसंबंधासाठी भाग पाडणाऱ्यांच्या छळास कंटाळून दोन महिन्यांपूर्वी जाळून घेतलेल्या महिलेचा मंगळवारी लातुरात मृत्यू झाला़ या खळबळजनक घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़
लातूर येथील अनामिका (नाव बदलले आहे) हिने १० जानेवारी रोजी जाळून घेतले होते़ याबाबत तिने गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन खाजा हकीम शेख, शमा हकीम शेख, शहारुख शबीर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद असून, तिघेही कारागृहात आहेत़ या तिघांनी तिला फसवून शरिरसंबंधास भाग पाडले़ तसेच त्याचे चित्रीकरण केले. चित्रफितीचा आधार घेत धमकावणे सुरु होत़ निराश झाल्याने महिलेने १० जानेवारी रोजी जाळून घेतले़ दोन महिन्यांपासून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते़ लातूरच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला़