पुण्यात कर्वे रोडवर भरदिवसा सुरू झाली 'पॉर्न' फिल्म
By Admin | Updated: August 27, 2016 12:02 IST2016-08-27T11:51:04+5:302016-08-27T12:02:12+5:30
पुण्यात भरदिवसा, खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागल्याने ट्रॅफिक जॅम झाले.

पुण्यात कर्वे रोडवर भरदिवसा सुरू झाली 'पॉर्न' फिल्म
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - सभ्य, सुसंस्कृत , विद्याविभूषितांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात भरदिवसा, खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागल्याने वेगळीच चर्चा रंगली. गेल्या आठवड्यात सोमवारी, पुण्यात कर्वे रोडवर डिजीटल होर्डिंगवर "पॉर्न व्हिडिओ‘ची वेबसाईट झळकल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. एका नेटिझनने या घटनेचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केल्याने ही अजब घटना समोर आली आहे.
पुण्यातील कर्वे रोडवर नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ सुरु होती, गाडीवाले आणि पादचारी त्यातूनच वाट काढून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे वाहतुकीचा गोंधळ अजूनच वाढत होता. मात्र अचानक वाहतुकीचा वेग मंदावला. त्याच कारण म्हणजे तेथील इलेक्ट्रॉनिक जाहिरात बोर्डवरील लाल अक्षरं गायब झाली आणि तिथे पॉर्न फिल्मच्या छटा उमटल्या.
जाहिरात फलकावर चक्क पॉर्न फिल्म लागल्याने सगळेच भांबावले, सुस्साट जाणा-या गाड्यांचे स्पीड अचानक कमी झाले आणि सर्वजण लपूनछपून त्या बोर्डावर नजर टाकू लागले. मात्र वाहनांचा वेग अचानक मंदावल्याने कर्वे रोड मोठी वाहतूक कोंडी झाली.
भररस्त्यात एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागलीच कशी हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, असं डिजीटल बोर्डाचे काम पाहणा-या व्यक्तीन सांगितलं. बोर्ड खराब झाल्यामुळे ऑनलाईन रिपेअरिंग सुरु असताना तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, अशी सारवासारव करण्यात येत आहे.