लोकसंख्या वाढली, लोकल फे-या वाढवा!

By Admin | Updated: February 11, 2015 06:20 IST2015-02-11T06:20:24+5:302015-02-11T06:20:24+5:30

मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात

Population grew, local fare extended! | लोकसंख्या वाढली, लोकल फे-या वाढवा!

लोकसंख्या वाढली, लोकल फे-या वाढवा!

मुंबई : मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी एकमुखी मागणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्याचप्रमाणे स्थानकांवर चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी करतानाच गरजेनुसार स्थानकांवर प्रसाधनगृह बांधण्यात यावे, अशी मागणीही खासदारांकडून करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या सीएसटी येथील मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत खासदार कपिल पाटील, राहुल शेवाळे, हुसेन दलवाई, किरीट सोमय्या, श्रीरंग बर्णे तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी खासदारांकडून आपल्या विभागातील रेल्वे प्रश्नासंबंधित मागण्यांचे निवेदन रेल्वेला सादर करण्यात आले. रेल्वेच्या जमिनींवर अतिक्रमण झाले असून, हे अतिक्रमण हटवून रेल्वेने आपली जमीन ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी आपले प्रकल्प यशस्वीपणे राबवावेत, अशी सूचना या वेळी खासदारांनी केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Population grew, local fare extended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.