शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पूनम महाजन, तुमच्या घरात ‘महाभारत’कसं घडलं.. ? अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:20 IST

अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या  वक्तव्याचा समाचार घेतला. 

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार यांची शिवसेनेवर टीका

बारामती : पूनम महाजन, तुमच्या वडिलांना चुलत्याने का मारले?  हे महाभारत कसं घडलं? कशामुळे घडलं, याची विचारणा केली. तसेच तुम्हाला बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं,असा घणाघणाती टीका करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार पूनम महाजन यांना खडेबोल सुनावले. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या  वक्तव्याचा समाचार घेतला. पवार म्हणाले, ह्यआपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती याची जाण ठेवा. ज्येष्ठ नेते  शरद पवार आणि प्रमोद महाजन यांचे संबंध कसे होते. या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्या. जर आम्ही म्हटलं की, तुमच्या वडिलांना चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे, असा सवाल करीत अजित पवार यांनी महाजन यांना खडेबोल सुनावले. आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ———...लोकांना फसवण्याचा प्रयत्न ज्यांना खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ असे म्हणणारे आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे, असे म्हणत आहेत. मतांवर डोळा ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न हे शिवसेनावाले करीत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करणारे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रिकरणाची भाषा करीत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी शिवसेनेवर केली.  

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoonam Mahajanपूनम महाजनPoliticsराजकारण