शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

Pooja Chavan Case : आम्हाला बदनाम करू नका, अन्यथा..., पूजा चव्हाणच्या वडिलांचा संताप

By पूनम अपराज | Updated: February 14, 2021 19:39 IST

Pooja chavan Case : तिच्यावर पूर्ण विश्वास होता असल्याची सांगून पूजाचे आत्महत्येचे राजकारण करणं थांबवा असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देउगाच मला बदनाम केले तर मीच आत्महत्या करेन, तेव्हा पूजाच्या आत्महत्येचे राजकारण करू नका, असे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केले आहे. 

हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या संवेदनशील घडनेबाबत पूजाचे वडील यांनी आमची मुलगी असे कृत्य करणार नाही. तिच्यावर पूर्ण विश्वास होता असल्याची सांगून पूजाचे आत्महत्येचे राजकारण करणं थांबवा असे आवाहन केले आहे.

लहू चव्हाण पुढे म्हणाले की, खूप चांगली मुलगी होती,  उगाच बदनाम करत आहेत. असं काही नाही, लोक म्हणतात राजकीय दबावातून तुम्ही बोलत नाही. ज्यावेळी आम्ही पुण्याला गेलो; त्यावेळी आम्ही चौकशी केली. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाकडे विचारणा केली. तेव्हा चक्कर येऊन पूजा खाली पडली असं सांगितले. त्यावेळी मी खाली होतो, असं त्या मुलाने सांगितले त्यामुळे मी कोणावर आरोप करू, तिच्या कर्जाचा बोजा होता. उगाच मला बदनाम केले तर मीच आत्महत्या करेन, तेव्हा पूजाच्या आत्महत्येचे राजकारण करू नका, असे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी कैफियत मांडली आहे. 

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

२५ ते ३० लाखाचे कर्ज तिच्यावर होते. वडिलांचे चांगले व्हावे म्हणून तिने बँकेतून कर्ज काढले होते. बांधकाम केले आणि पोल्ट्री व्यवसाय सुरु करतानाच कोरोना आला. त्यामुळे कोंबड्या आम्ही फुकट वाटल्या. १ रुपया न मिळता २५ लाख नुकसान झाले; सरकारने काहीच मदत केली नाही.  मित्राकडून उसने पैसे घेऊन संसार सुरु आहे.  सहा मुली आहेत. त्यामुळे कसाबसा घरप्रपंच चालू होता. त्यात बर्ड फ्लू आला. त्यानंतर पूजा म्हणाली माझं मन लागत नाही, मी पुण्याला जाते. मी पूजाला २५ हजार दिले आणि ती पुण्याला गेली. ८ ते दहा दिवस  मी फोन करत होते, पैसे हवे का विचारले. ती नको म्हणाली. त्यानंतर पूजाच्या मित्राचा मला रात्री २ वाजता कॉल आला की, पूजा बाल्कनीतून पडली. डोक्याला मार लागला आहे. तुम्ही ताबडतोब या. मी गेलो, त्यावेळी ती मयत झालेली होती. आमची बदनामी सुरु असून ती थांबवा अन्यथा मीच आत्महत्या करेन असे पूजाचे वडील म्हणाले.   

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. पूजाने तिच्या मृत्युच्या पूर्वी मद्यपान केलेले होते. तसेच ती कठड्यावर बसलेली होती. त्यामुळे ती पडली का तिला पाडलं की तिने खरंच आत्महत्या केली आहे, याची चौकशी आता पोलिस करत आहेत. या प्रकरणी आता तिच्या कुटुंबीयांनी मौन सोडले असून राजकीय वळण देणं थांबवण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणPoliceपोलिसSuicideआत्महत्या