अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा

By Admin | Updated: October 15, 2015 17:25 IST2015-10-15T17:23:46+5:302015-10-15T17:25:33+5:30

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.

Pooja of Ambabai as the patience | अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा

अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा

>कोल्हापूर, दि. १५ -  शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. 
गुरुवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक करण्यात आला. दुपारच्या आरतीनंतर देवीची श्री धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. अष्टलक्ष्मीतील तिसरी देवता म्हणजे श्री धैर्यलक्ष्मी. ही देवता भक्ताच्या मनातील भय-भीतीचा नाश करून त्याच्याठायी धैर्य, पराक्रम उत्पन्न करते. त्यानुसार भीतीचा नाश व शौर्य-पराक्रमासाठी या देवतेची उपासना करतात. ही पूजा दीपक कुलकर्णी, विवेक सरमुकद्दम, अरविंद कुलकर्णी, अलोक कुलकर्णी यांनी बांधली. 
 
 
 

Web Title: Pooja of Ambabai as the patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.