पंदेकृविचे कृषी साहाय्यक पदे भरणार

By Admin | Updated: January 26, 2015 00:45 IST2015-01-26T00:32:17+5:302015-01-26T00:45:51+5:30

६९ जागांसाठी ३,३७५ उमेदवारांनी दिली परीक्षा.

Pondicrobial Agricultural Assistant posts will be filled | पंदेकृविचे कृषी साहाय्यक पदे भरणार

पंदेकृविचे कृषी साहाय्यक पदे भरणार

अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ६९ कृषी साहाय्यक पदासाठी ३,३७५ उमेदवारांनी रविवार, २५ जानेवारी रोजी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये लेखी परीक्षा दिली.
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत नोकर भरती करण्यासाठी शासनाने एक महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि हे मंडळ कार्यरत झाले नसल्याने कृषी विद्यापीठाची नोकर भरती प्रक्रिया रखडली होती. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कर्मचारी अनुशेष पंधराशेपेक्षा जास्त जागांनी वाढला आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठांनी ही वस्तुस्थिती शासनासमोर मांडल्यानंतर शासनाने जुन्या पद्धतीनुसारच भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश एक महिन्यापूर्वी कृषी विद्यापीठांना दिले होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला कृषी साहाय्यक पदवीधर ३३ आणि कृषी साहाय्यक पदविका ३६ जागासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, प्राप्त अर्जाच्या छानणीनंतर दोन्ही साहाय्यक पदासाठी अनुक्रमे १0३९ आणि २,३३६ उमेदवारांना लेखी परीक्षेला बोलावले. ही परीक्षा अकोला शहरातील एलआरटी कॉर्मस, आरएलटी विज्ञान, सीताबाई कला आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती यांनी ६९ कृषी साहाय्यक पदासाठी पदवी आणि पदविका मिळून ३,३७५ उमेदवारांची लेखी परीक्षा २५ जानेवारी रोजी घेण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Pondicrobial Agricultural Assistant posts will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.