पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया लवकरच
By Admin | Updated: May 26, 2014 01:08 IST2014-05-26T01:08:27+5:302014-05-26T01:08:27+5:30
दहावीचे निकाल जाहीर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी अनेक विद्यार्थ्यांंंकडून ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमांबद्दल विचारणा सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी राहणार

पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया लवकरच
तंत्रशिक्षण संचालनालय : अधिकार्यांनी दिले संकेत नागपूर : दहावीचे निकाल जाहीर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी अनेक विद्यार्थ्यांंंकडून ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमांबद्दल विचारणा सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी राहणार व कधीपासून सुरू होणार याबद्दल विद्यार्थ्यांंंमध्ये उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांंंची ही प्रतीक्षा लवकरच संपेल व लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे संकेत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकार्यांनी दिले आहेत.‘एआरसी’ प्रवेशअर्ज दाखल करणे, कागदपत्रे सादर करणे व अर्जाचे सत्यापन करणे इत्यादी बाबींसाठी नागपूर विभागात २४ महाविद्यालयांत प्रवेशाचे प्रमुख टप्पे -माहिती पुस्तिकेची विक्री -ऑनलाईन अर्ज भरणे -कागदपत्रांची पडताळणी -अर्जाचे सत्यापन -केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) ऑनलाईन यादी - पसंतीक्रम भरणे -तीन फेर्यांसाठी यादी -प्रत्यक्ष प्रवेश -रिक्त जागांसाठी दहावीनंतर अकरावीत प्रवेश न घेता पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपल्या करिअरचा मार्ग शोधणार्या विद्यार्थ्यांंंची संख्या फार मोठी आहे. निकाल लागण्याअगोदरपासूनच विद्यार्थ्यांंंची विचारपूस करायला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. या प्रवेशप्रक्रियेत शासकीय, खासगी संस्थांचा समावेश असेल अशी माहिती अधिकार्यांनी दिली. यंदा होणार्या प्रवेशप्रक्रियेत अभियांत्रिकीप्रमाणेच तीन प्रमुख व एक कौन्सिलिंगचा राऊंड घेतला जाईल तर २७ अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य पातळीवरील गुणवत्तेनुसार असतील. ही प्रवेशप्रक्रिया एकूण ६९ निरनिराळ्या अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येईल. यात सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स यांच्याप्रमाणे पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर, ट्रॅव्हल अँन्ड टुरिझम या अभ्यासक्रमांना देखील चांगलाच प्रतिसाद असतो, असे दिसून आले आहे. विभागात २४