पॉलिटेक्निक प्रवेशास २ जुलैपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: June 29, 2016 05:05 IST2016-06-29T05:05:15+5:302016-06-29T05:05:15+5:30
पॉलिटेक्निकच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या १० दिवसांत केवळ ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पॉलिटेक्निक प्रवेशास २ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या १० दिवसांत केवळ ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेश अर्ज करण्यास तंत्रशिक्षण संचालनालयाने २ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी पॉलिटेक्निकच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत २९ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र त्यात वाढ करत हंगामी गुणवत्ता यादी लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. २ जुलै रोजी प्राथमिक आणि ५ जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार असून यंदा प्रवेशाच्या चार फेऱ्या होतील. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील ३९६ अर्ज स्विकृती केंद्रांवर गेल्या १० दिवसांपासून प्रवेश अर्ज विक्री सुरू आहे. मात्र अर्ज खरेदीची संख्या पाहता विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)