शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीची विद्यार्थी घेणार शपथ! शिक्षण संचालकांचे पत्र; राज्यभरातील शाळांमध्ये उपक्रम घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:45 IST

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना

नितीन गव्हाळे अकोला : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ची शपथ देण्यात येणार आहे.आतषबाजीमुळे दिवाळीत मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे फुप्फुसाचे, श्वसनाचे आजार होतात.आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे, या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पअभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्याचे सूचित करण्यात आले आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाºयांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :diwaliदिवाळीStudentविद्यार्थीSchoolशाळा