शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:56 IST

यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   

मुंबई : लॉकडाऊनमध्ये हवेची गुणवत्ता बरीच सुधारली होती. अनलॉकनंतर गर्दी करण्यावर मर्यादा असल्यामुळे तसेच फटाके फोडण्यावर बऱ्यापैकी बंधने आल्यामुळे ती फारशी बिघडली नाही, असा जर तुमचा समज असेल, तर तो तद्दन गैरसमजच होता असे नक्की समजा. कारण अनलॉक आणि त्यापाठोपाठ आलेले दसरा-दिवाळी हे सण आपण इतक्या धडाक्यात साजरे केले की, यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या पर्यावरणविषयक अभ्यास करणाऱ्या प्रख्यात संस्थेने हा धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. का वाढले प्रदुषणअनलॉकनंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, बाजार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आल्याने वायुप्रदूषणाने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हवा अधिक दूषित झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित दिवस मुंबई, कल्याण    १५ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडानवी मुंबई, नागपूर, नाशिक    २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडापुणे    ८ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाचंद्रपूर    १ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाऔरंगाबाद    २२ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासोलापूर    ६ डिसेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासर्वांत स्वच्छ हवेचे दिवस मुंबई, नवी मुंबई, कल्याण, सोलापूर    ५ जुलै २०२० रोजी संपलेला आठवडानागपूर, नाशिक, पुणे    ऑगस्ट २०२० या महिन्यात औरंगाबाद    २५ मे २०२० रोजी संपलेला आठवडाअहवालातील बाबी बृहन्मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हवेची प्रदूषण पातळी सध्या धोक्याबाहेर गेली आहे. यंदाच्या हिवाळ्यात स्वच्छ हवेचे दिवस खूप कमी असतील. यंदा दोन आठवड्यांपूर्वीच हिवाळ्याची चाहूल लागली. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत बृहन्मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक वायुप्रदूषण झाले.ऑक्टोबरमध्ये राज्यातील हवा ४० टक्के अधिक दूषित होती तर हे प्रमाण नोव्हेंबरमध्ये सरासरी ४६ टक्के होते. दिवाळीच्या दिवशी तर प्रदूषणाने ६० टक्क्यांची पातळी गाठली होती. स्वच्छ हवेसाठी उपायहवेतील प्रदुषण कमी करायचे असेल तर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, दर्जेदार इंधनाचा पुरवठा, वीज प्रकल्पांतून कमीतकमी प्रदूषण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर या उपायांची कटाक्षाने कास धरावी लागेल.     - अमृता रॉयचौधरी,     कार्यकारी संचालिका, सीएसई 

टॅग्स :pollutionप्रदूषण